छत्रपती संभाजीनगर: पहाडसिंपुरा बौद्ध लेणी परिसरातील दलित इनाम जमिनी काही भू-माफियांनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केला, आणि धक्कादायक बाब म्हणजे या कटात तहसील विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. मात्र, राज्यघटना बचाओ संघर्ष संघाने या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, दलितांच्या हक्काची जमीन कोणत्याही परिस्थितीत भूमाफियांच्या घशात जाऊ दिली जाणार नाही. याप्रकरणी न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, संबंधित अधिकारी आणि भू-माफियांच्या सांठगांठीचा पर्दाफाश करण्यात येईल.
तहसील विभागातील अधिकाऱ्यांची भू-माफियांना मदत?
सूत्रांच्या माहितीनुसार, तहसील कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी बोगस दस्तऐवजांना वैधतेचा आधार देत असून, दलितांची जमीन बळकावण्याच्या कटात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सामील आहेत. त्यांच्या मदतीमुळेच हे घडत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संघाने या अधिकाऱ्यांवर निलंबन आणि फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

संघाचा इशारा – अन्याय सहन केला जाणार नाही!
“राज्यघटना हीच आमची ताकद आहे! दलितांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या कोणालाही आम्ही शांत बसू देणार नाही,” असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गरीब वंचितांना न्याय मिळत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, संघाच्या आंदोलनामुळे प्रशासनाच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा संघाने दिला आह