कल्याण : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याचा मुक्काम आता आणखी पाच दिवसांनी वाढला आहे. बदलापूर आंदोलन प्रकरणी ३०० ते ४०० आंदोलनकर्त्यांवर कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर २८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे अजूनही धरपकड सुरूच आहे. आरोपी अक्षय शिंदे याला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी आज २१ ऑगस्टला संपणार होती. पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आरोपीने अश्या प्रकारची आणखी काही लैंगिक शोषण किंवा कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मुलींना आरोपी काय सांगून न्यायचा आणि त्यांच्यावर कसा अत्याचार करायचा, या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांच्या या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने २६ तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान बदलापूरमधील या घटनेवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित सर्वांवरकारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. दिपक केसरकर म्हणाले की, सदर घटना१२ तारखेला घडली होती मात्र शाळेने ही घटना दाबली होती. संबंधित संस्था चालकांनी अपली बदनामी होईल म्हणून प्रकरणं दाबून ठेवलं आहे. संबंधित पोलीस स्थानकात असणाऱ्या पीआय यांनी देखील कारवाईमध्ये दिरंगाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल.

बदलापूर आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित : मुख्यमंत्री
बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचारानंतर रेल्वे रोको आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं आणि लहान मुलीवरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे. या घटनेचं राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलीय. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याबाबत पोलिसांना सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले
आज भारत बंद, उत्तर भारतात हिंसक वळण पुणे : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी)
संदर्भात १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. एससी आणि एसटी आरक्षणात आता उपवर्गीकरणाला मान्यता देत सर्वोच्च न्यायालयाने क्रिमीलेअर लागू करण्याचे निर्दे श दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरक्षण बचाओ समितीने २१ ऑगस्टला भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये बहुजन समाज पक्षासह विविध पक्ष, संघटना सहभागी आहेत. महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी बंद मध्ये सहभागी होणार आहे. या बंदमुळे झारखंडमध्ये बससेवा प्रभावित झाली असून बिहारमध्ये महामार्ग रोखण्यात आला आहे.