वैजापूर (प्रतिनिधी) – वैजापुरातील कुख्यात
गुन्हेगार राहुल गणेश शिंदे (वय २६) याला तिसऱ्यांदा एमपीडीए अँक्ट अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल शिंदे हा वैजापूर शहरातील वडारवाडा येथील रहिवासी असून त्याच्यावर बलात्कार जबरी चोरी, दरोडा, विनयभंग, जबर दुखापत करणे, घातक शस्त्राने हल्ला करणे, चोरी, वाटमारी असे १२ गंभीर गुन्हे दाखल असून त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरूच असल्याने दहशतीचे वातावरण तो निर्माण करत होता. यामुळे त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी
यांच्याकडून मंजुरी देण्यात आली होती. तर १ मे रोजी त्याला हर्मूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदरची पोलीस मनीष अप्पर कारवाई अधीक्षक कलवानिया पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या म जिल्हाधिकारी ार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ पोलीस निरीक्षक
शामसुंदर कौठाळे, पोलिस अमलदार नाम देव शिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे , वाल्मीक निकम, संजय तांदळे, दीपक सरसे, प्रशांत गिते यांनी केली आहे.
