फुलंब्री प्रतिनिधी हेमंत वाघ / टाकळी कोलते,ता.फुलंब्री येथील शेतकरी सुभाष कोलते यांच्या घरातून चोरी झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने संबंधित शेतकऱ्याला वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते परत करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ता.14 एप्रिल 2024 रोजी कोलते टाकळी , ता.फुलंब्री येथील प्रभाकर कोलते यांच्या घरी जबरी चोरी झाली होती.सदर प्रभाकर कोलते यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे वडोद बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे यांनी केला होता.व सदर तपास दरम्यान आरोपीकडून प्राप्त झालेल्या मुद्देमाल दहा हजार रोख रक्कम व तीन तोळे सोन्याचे दागिने हे सदर फिर्यादी प्रभाकर कोलते यांना परत करण्यात आले.माननीय न्यायालयाच्या आदेशाने
सदर तपासाची कारवाई माननीय मनीष कलवानीया पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, माननीय सुनील लांजेवार अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे पोलीस ठाणे वडोद बाजार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे ,बीट जमादार दत्तात्रय मोरे, पोलीस हवालदार अंकुश बागल, पोलिस अंमलदार शिवनाथ दराडे, पोलीस अंमलदार सिद्धार्थ वक्ते पोलीस पाटील नारायण शिंदे यांनी केली.