तिसगाव व तिसगाव तांडा येथे मतदार जागृती मोहिमेला उदंड प्रतिसाद !

तिसगाव व तिसगाव तांडा येथे मतदार जागृती मोहिमेला उदंड प्रतिसाद !

छत्रपती सांभाजीनगर तिसगाव व तीसागव अंतर्गत मतदारांच्या जागृतीसाठी सुरू केलेल्या स्वीप या अभियाना अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या उपक्रमांतर्गतच आज तालुक्यातील तिसगाव व तिसगाव तांडा येथील मतदारांशी संपर्क करून त्यांचे उद्बोधन करण्यात आले व उपस्थित मतदारांकडून 100% मतदान करण्या विषयक प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
याप्रसंगी श्री प्रकाश नाईक गटविकास अधिकारी ,नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी श्री विलास केवट साहेब, शिवाजीराव भोसले ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री एच. बी . कहाटे,मनोहर गावडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समान वस्ती. दीपकराज बोर्डे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलकापूर नंबर 2, श्री कुमावत सर श्री धनवे सर मुख्याध्यापक तिसगाव , BLO चंद्रशेखर काटकर, वासुदेव कोळी व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच तिसगाव व तिसगाव तांडा येथील अंगणवाडी सेविका तसेच आशा कार्यकर्ती दोन्ही गावचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *