तलवारीने वाढदिवसाचा केक कापनारा ईसम सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग यांचे पथकाकडून जेरबंद

तलवारीने वाढदिवसाचा केक कापनारा ईसम सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग यांचे पथकाकडून जेरबंद

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : दि. ०१/०८/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग यांना गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक ३१/०७/२०२४ रोजी कुवांर फल्ली, राजाबाजार येथील एका ईसमाने त्याचे वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने व चाकुने केक कापला तसेच सदर केक कापतांनाचा व्हायरल व्हिडीओची माहिती मिळाल्याने, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग यांनी सदर ईसमाचा शोध घेऊन त्याचे विरुध्द कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने, सदर ईसमाचा कुवांरफल्ली राजाबाजार येथे जाऊन शोध घेतला असता, शांती अपार्टमेंटच्या बाजुला रहात असलेल्या घरातून एका ईसमास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्याने त्याचे नाव संजय दत्तात्रय महारगुडे, वय ३५ वर्षे, धंदा ठेकेदार रा. राजाबाजार कुंवारफल्ली, छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले, त्यास तु दिनांक ३१/०७/२०२४ रोजी तलवारीने व चाकुने केक कापला का ? याबाबत विचारपुस केली असता, त्याने मी तलवारीने व मोठ्या चाकुने केक कापला

असल्याची कबुली दिली.
त्यावरुन त्याचे राहते घरातुन त्याचे ताब्यातुन जप्त असा १०००/- रुपयाचा मुद्येमाल ज्यात एक तलवार व चाकु जप्त करुन त्याचे विरुध्द पोलीस ठाणे सिटीचौ येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-०१ श्री. नितीन बघाटे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग श्री. संपत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक श्री. निवृत्ती गायके, पोअ/ नितीष घोडके, पोअ/आनंद वाहुळ, पोअ/गजानन शेळके सर्व नेमणूक पोस्टे सिटीचौक, छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *