माझ्या प्रत्येक संघर्षात इथल्या मातीतील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली, हा विश्वास कायम जपून ठेवीन – चव्हाण यांचा शब्द
फुलंब्री (प्रतिनिधी हेमंत वाघ) : : मारताय जनता पाटा आनु काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करून अपमान केला. बहुजन बांधवांच्या आज देखील भावना दुखावल्या जात आहेत. भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार म्हणून देशभर राज्यात भाजप विरोधी प्रचार सुरू केला आहे. असे काही नसून सविधान हा देशातील सर्वोच्च ग्रंथ आहे. त्याला बदलण्याचा प्रयत्न भाजपने केला नाही तर संविधान जनजागृतीची मोहीम भारतीय जनता पार्टीने हाती घेऊन बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान घराघरात पोहोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले आहे. त्याच कामाची दखल घेऊन आज प्रत्येक बहुजन बांधवांनी विचार करायला हवा सविधान रक्षणासाठी पंतप्रधानांचे सुरू असलेल्या कार्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या फुलंब्री मतदार संघातून मराठवाड्यातील सर्वात जास्त मताधिक्याने अनुराधा चव्हाण यांना विजयी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी अनुराधा चव्हाण यांना मतदान करा असे आवाहन अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्याजी यांनी केले. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. मतदार संघातील गणोरी सर्कल मधील नागरिकांनी माझ्यावर व चव्हाण कुटुंबावर अतोनात प्रेम केले. या भागात रस्ते विकास असेल किंवा या भागातील देवस्थानांना क दर्जा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न विवीध विकासकामांना निधी असेल, अनेक दिलेले शब्द मी पूर्ण केले. येणाऱ्या काळात देखील मी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला प्रत्येक वादा पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे, असे मत भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी गणोरी सर्कलमधील जन आशीर्वाद दौऱ्या दरम्यान बोलताना केले आहे. माझ्या प्रत्येक संघर्षात इथल्या मातीतील अठरा पगड जाती व विविध धर्मातील माझे सहकारी व इथली जनता माझ्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे. तुमचा हा विश्वास मी कायम हृदयात जपून ठेवेन, असा शब्दही यावेळी बोलताना चव्हाण यांनी दिला.

गणोरी सर्कल मधील गावांमध्ये शनिवार (दि. १६) रोजी अनुराधा चव्हाण यांचा जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. यादरम्यान उपस्थित जनसमुदायाला संवाद साधताना त्या बोलत होत्या. मतदारसंघाच्या फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद गटात विविध गावांमध्ये दिवसभर अनुराधा चव्हाण यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गावागावात जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या त्यांच्याशी संवाद साधला. चव्हाण यांनी सकाळी चिंचोली, सांजूळ, बिल्डा, मुर्शिदाबाद वाडी, गणेशपूर,, शेलगाव, जानेफळ, वानेगाव, शेरोडी खुर्द, शेरोडी बु., डोंगरगाव (शिव), वाहे गाव, आड गाव (भुमे), पिंपळगाव (वळण), पिंपळगाव (देव), म्हसला, रेलगाब, गणोरी या सर्वच गावांमधून अनुराधा चव्हाण यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, प्रत्येक रॅली बैठकीला अगदी जाहीर सभेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब तांदळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इलियाज शहा, जिल्हाध्यक्ष किशोर जगताप, महेंद्र सोनवणे,
राधाकिसन पठाडे, संजय भालेराव, भाजप

महा मेळावा.
सौ. अनुखधाताई अतुल चव्हाप अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोशन अवसरमल, तालुकाध्यक्ष रवी कुलकर्णी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष झाकेर शहा, कृष्णा गावंडे, चंद्रकांत तुपे, बालू सोटम, राजू जाधव, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर जाधव, कवरसिग बैनाडे महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सविता नवले, तालुका प्रभारी भाजपा, राणी सोनवणे, नम्रता पटेल, रेखा आटुळे, आराधना सोळूके आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास कामांना मिळणार गती अनुराधा चव्हाण यांनी पुढे बोलताना म्हणाल्या की, मतदारसंघात जलजीवन मिशनमधून सुरू असलेली कामे, पर्यटन विकास मधून पूर्ण केलेली व सुरू असलेली कामे, यांसह विविध तीर्थक्षेत्रांचा विकास त्याचबरोबर या माध्यमातून आगामी काळात होणारे लाभ आदी विषयांवर प्रकाश टाकला.