डॉ प्रसाद हा डॉक्टर आहे का अंबडचां डॉन ?

डॉ प्रसाद हा डॉक्टर आहे का अंबडचां डॉन ?

बातमी का लावली म्हणून दै चालु वार्ता मुख्य संपादक यांना फोन वर शिवीगाळ व धमकी…

जालना : अंबड तालुक्यात धनगर पिंपरी येथील वैदकिय अधिकारी डॉ प्रसाद काकडे यांनी आज सकाळी (दि : 2 जुलै ) दै चालु वार्ता मुख्य संपादक यांना फोन करून शिवराळ भाषेचा वापर केला. आणि वैद्यकीय बातम्या पुन्हा लावाल्या तर बगुन घेण्याची एकेरी भाषा वापर करत धम दिला.सविस्तर बातमी असी कि डॉ प्रसाद काकडे अंबड तालुक्यात धनगर पिंपरी आरोग्य सेवा केंद्र येथे कार्यरीत आहेत. पण यांच्या बदल आजूबाजूच्या गावाकऱ्यांच्या अनेक तक्रारी वारंवार असतात. आणि ते अनेक वेळा केंद्रावर उपस्तिथ नसतात त्यामुळे अनेक वेळा रुग्णाची गैर सोय होते. नेहमी प्रमाणे हे डॉक्टर मोहद्य शनिवारी उपस्तिथ नव्हते, एक घटना घडली आणि आणि एक रुग्ण तात्काळ प्राथमिक उपचारासाठी धानोरी पिंपरी आरोग्य केंद्र येथे पोहचला. रुग्णला दमा असल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्र्ास होत असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार मिळणं आवश्‍यक होत. पण रुग्ण आरोग्य केंद्रावर पोहचला तेव्हा तिथे डॉ प्रसाद काकडे उपस्तिथ नव्हते.

त्यामुळे नाइलाजासत्व रुग्णला पुढे उपचारासाठी घेऊन जावं लागलं आणि प्राथमिक उपचाराला वेळ झाल्यामुळे रुग्णचां मृत्यू झाला. ही सविस्तर माहिती मृत्यू झालेल्या रुग्णच्या मुलानी दै चालु वार्ता प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे यांना दिली. आणि त्याचं आधारवार दै चालु वार्ताला बातमी लागली. बातमी कसी लागली ती खोटी आहे असं म्हणतात सकाळी दै चालु वार्ता मुख्य संपादक यांना शिवीगाळ करून दम दिला. आता पत्र्कार व संपादक यांनी सामान्य लोकांसाठी प्रश्न विचारायचा का नाही ? असं प्रश्न पडतो. पत्र्काराणा लोकांचे प्रश्न मांडण्याचा संविधानिक अधिकार असताना डॉ प्रसाद सारख्या उच्चशिक्षित अधिकारी जबाबदार व्यक्तींना बेजबाबदारी बोलत असतील तर कसं हे रुग्णची सेवा करत असतील असा प्रश्न आता स्थानिक लोकं विचारात आहेत. दै चालु वार्ता डॉ प्रसाद काकडे यांच्या विरोध कायदेशीर रित्या प्रशासनाला प्रश्न विचारेल आणि डॉ तुमच्या बेजबाबदार पणा मुळे रुग्ण दगावला हा प्रश्न पेपर मध्ये मांडला तर डॉ प्रसाद काकडे तुम्हाला राग का आला पाहिजे? मग डॉ प्रसाद हा डॉक्टर आहे का अंबडचां डॉन असं प्रश्न आता जणमाणसात निर्माण झाला आहे. आता आरोग्य प्रशासन – डॉ प्रसाद काकडे याच्यावरती काय कारवाई करणार याकडे सर्व अंबड वासियांचे पूर्ण लक्ष आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *