पैठण (प्रतिनिधी) : दि.9 मे 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजता जोडवाडी येथे विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या (स्मारक) भूमीपूजनाचा कार्यक्रम (ठिकाण जोडवाडी ते धर्मतीर्थ (आडूळ) फाटा वळणावर) पैठण तालुक्याचे आमदार मा.विलास बापू भुमरे साहेबांच्या हस्ते नारळ फोडत उद्घाटन करण्यात आले. सर्व प्रथम आमदार साहेबांच्या हस्ते विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच नारळ फोडून स्मारकाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मा.आमदार साहेबांचे शाल घालून जोडवाडीचे सरपंच प्रतापसिंग गुसिंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी राजपूत समाजाचे धडाडीचे नेते तथा राजपूत समाजाला एकत्र आणून समाजाची ताकद वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले, तसेच खासदार मा.संदीपान पाटील भुमरे साहेब आणि आमदार मा.विलास बापू भुमरे साहेबांचे समर्थक मा.श्री.गजानंद बोहरा यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत या कार्यक्रमासाठी हजर असलेले पंचक्रोशीतील तमाम आजी माजी सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तथा कार्यकर्ते आणि राणा प्रेमी यांचे शब्दसुमनाने स्वागत केले. आणि विलास बापू यांना विनंती केली की जोडवाडी, होनोबाची वाडी तसेच राजपूत समाजाच्या सर्व वाड्या वस्त्यांमध्ये विकासाची कामे करण्यात यावी

आणि वाडी वस्ती वरील आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करत समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास करावा अशी मागणी आमदार विलास बापू साहेबांकडे समाजाच्या वतीने गजानंद बोहरा यांच्याकडून करण्यात आली. त्यावर आमदार साहेबांनी शब्द दिला की मी आपल्या सर्व मागण्या पूर्ण करणार आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी अजून जितका निधी पाहिजे असेल तितका उपलब्ध करून देणार तसेच हा राजपूत समाज नेहमीच आमच्यासोबत असतो त्याकरिता मी राजपूत समाजाचे आभार मानतो असेही आमदार साहेबांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजक जोडवाडीच्या सरपंच सौ.संगीता ताई गुसिंगे, प्रतापसिंग गुसिंगे, नियोजनकर्ता गजानंद बोहरा, शिवचैतनन्यगिरी महाराज, मा.सभापती बाबासाहेब राठोड, माजी सरपंच बुधसिंग जारवाल, बुधसिंग गुसिंगे, प्रकाश जिजा, अमर पवार, जाधव, सरपंच अंकुश फतपुरे, लहू तात्या भानुसे, आप्पासाहेब भानुसे, पिंटू तांबे, उपसरपंच इंदल नागलोत, सरपंच मोरेश्वर राठोड, किशोर चौधरी, हिरामण राठोड, किशोर दसपुते, प्रताप जोनवाल, कचरू जारवाल, विजय काकरवाल, तांबे पाटील पृथ्वीराज जारवाल, मुन्ना बहुरे संजय गुसिंगे, अमोल जारवाल, पवन सत्तावन. संजय डोभाळ, कारभारी महेर, विनोद जाधव, अशोक चव्हाण, पूनम ठाकूर, सजन बहूरे, रूपसिंग भोपळात, शरद ढगे, कारभारी जारवाल, ताराचंद जारवाल, संदीप जाधव, पांडू जाधव, आणि मोठ्या संख्येने राणा समर्थक, महिला भगिनी आणि तरुण मंडळ उपस्थित होते.
