छत्रपती संभाजीनगर : ‘तुला फार मस्ती आली आहे का, तू या वस्तीचा दादा आहे का’, असे म्हणत सात ते आठ जणांनी एका तरुणाला जुन्या वादातून बेदम मारहाण केली. ही घटना १७ मे रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा नोंदवला. दिनेश साईनाथ इंगळे (रा. शताब्दीनगर) या गंभीर जखमी युवकाच्या तक्रारीवरून अरबाज खान, गोरू खान, सलमान खान, अमेर खान, राजू शेख, सिकंदर शेख, समीर शेख (सर्व रा. शताब्दीनगर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला, तर तैय्यब नासेर सय्यद याच्या तक्रारीवरून अनिकेत निकाळजे, दिनेश इंगळे, किशोर पगारे, रवी पगारे (रा. सर्व शताब्दीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
