फुलंब्री { प्रतिनिधी हेमंत वाघ } ; फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा वडोद वस्ती येथे मंगळवार रोजी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शाळेत यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन खूपच हर्ष उल्हासात साजरे झाले.वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वडोदबाजार ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती.पाकीजाबी साबेरखा पठाण, उपसरपंच श्री.डॉ.गोपाल वाघ, वडोदबाजार केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.पठाडेसर सामाजिक कार्यकर्ते श्री. गोविंद मामा पांडेजी,डॉ. सुहास वायकोस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.जावेदखान पठाण यांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस व बहारदार मराठी व हिंदी गाण्यांनी कार्यक्रमात खूपच रंगत आणली.सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर,समाज प्रबोधनात्मक तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित अप्रतिम अशा नाटिका सुद्धा सादर केल्या.अप्रतिम अशा लावणीने कार्यक्रमात तर बहारच आणली.आपल्याच लहानग्यांची बहारदार व मनोवेधक अदाकारी बघून प्रेक्षकांनी भरभरून बक्षीसांचा आपल्या चिमुकल्या बालकलाकारांवर अक्षरशः वर्षाव केला.

सदरील कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शाळेचे प्रांगण आबालवृद्धांनी अगदी भरगच्च भरून गेले होते.सदरील कार्यक्रमासाठी पालकांबरोबरच गावातील प्रतिष्ठित मंडळी श्री. साबेरखान पठाण,समितीचे उपाध्यक्ष श्री. सादेकखान पठाण,श्री.राजू काळेसर,श्री.राजू बाविस्करसर,श्री.शुभम गंगावणे,श्री रईस शहा,श्री.मोसिन सय्यद,श्री.अशोकदादा शिनगारे,श्री.अरुणभाऊ वायकोस यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय चिकटे,शिक्षक श्री.सर्जेराव बडक,श्रीमती.वंदना पाटील,श्रीमती.जयश्री बोराडे,श्रीमती.अनिता काचोळे,श्रीमती.निकिता शिनगारे आदींनी अथक परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते