फुलंब्री ; { प्रतिनिधी हेमंत वाघ} ; फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी यांना रविवारी (दि. 12) जयंती दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच पती संजय भूमे यांनी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी आडगाव बुद्रुक येथील पत्रकार शुभम जगताप,धोंडिबा गवरे, ज्ञानेश्वर भूमे, ज्ञानेश्वर चव्हाण, अजिबाथ भूमे, रामनाथ पदमे, सुनील भूमे, अंकुश जगताप, वाल्मिक भूमे, पवन काळे, गजानन भूमे, योगेश चव्हाण आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.
