जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डिजेवर नाचत असताना

जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डिजेवर नाचत असताना

धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन जणांवर तलवार, दगड, लाठ्या काठ्यांनी मारहाण

घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी; व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मयत तरुणाचे नाव; जमखी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु

जालना (प्रतिनिधी) : जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डिजेवर नाचत असताना धका लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन जणांवर तलवारीने वार केल्याची घटना आज घडलीय. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय, व्यंकटेश तुकाराम गायकवाड यय २२ वर्ष रा. कैकाडी मोहल्ला जुना जालना असं मयत व्यक्तीचे नाव आहे. तर आशिष दीपक जाधव वय १६ वर्ष रा. कैकाडी मोहल्ला जुना जालना असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जालना शहरातील शास्त्री मोहल्ल्यात लग्राचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. स्यादरम्यान डिजे लावलेला असताना डीजेवर
नाचत असताना चका लागल्याच्या किरकोळ कारणावरून ही मारहाण झाली. यात दगड, तलवार, लाठ्या, काठ्यांनी झालेल्या मारहाणीत व्यंकटेश गायवाकड बाच्या डोक्यात तलवार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर आशिष
जाधव हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याच्यावर जिल्हा सामान्य रुणालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडालीय, नातेवाईकांनी व्यंकटेश ला रुग्णालयात दाखल केले असताना उपस्थित डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जो पर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही,

पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय, दरम्यान घटनेची माहिती
मिळताच कदिन जालना पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जमलेला जमाच शांत केला, घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पाली, य घटनेमुळे मोठ्या संख्येने जमाव जमला होता. सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत असून मयताच्या नातेवाईकांनी इन कॅमेरा शब विच्छेदनाची मागणी केलीय. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली व याप्रकरणी आम्ही सात संशयतांना ताब्यात घेतला असल्याचं मयताच्या नातेवाईकांना सांगितल

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *