जालना महानगरपालिकेच्या महिला बचतगटाव्दारे उत्पादित सॅनिटरी पॅड निघाले गुजरात व मध्यप्रदेशला

जालना महानगरपालिकेच्या महिला बचतगटाव्दारे उत्पादित सॅनिटरी पॅड निघाले गुजरात व मध्यप्रदेशला

जालना : (प्रतिनिधी) महानगरपालिका अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटाद्वारे निर्मीत व उत्पादीत कापडी पुनःरवापर करता येणारे व वापरण्यासाठी सहज असणारे सॅनिटरी पॅड तयार केले जातात या पॅडसाठी गुजरात व मध्यप्रदेश येथून मोठ्या प्रम जालना, ाणावर मागणी असून या मागणी अंतर्गत आज आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड मॅडम यांच्या उपस्थिती ४००० पॅड ची पाहिली ऑर्डर मध्यप्रदेश मधील खरगोन जिह्यात दिव्य ज्योती सामाजिक विकास केंद्र येथे पहिली खेप पाठविण्यात आलीयाप्रसंगी बोलताना आयुक्त. संतोष खांडेकर म्हणाले की, या पुनः रवापर करता येणारे पॅड सर्व म हिलांनी वापरावेत तसेच स्थानिक पातळीवरही याची मोठ्या प्रमाणत जनजागृती करून जास्तीत जास्त महिलामध्ये जनजागृती करुन याचा वापर वाढवावा यामुळे पर्यावरण संतुलीत राहण्यास मदत होइल व पूर्णपणे कपड्याचे पॅड असल्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे ही सोपे होइल

. या कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक श्री. विजय फुलंब्रीकर तसेच विभाग प्रमुख श्री. घोळवे व एनयुएलएम विभागाचे कर्मचारी यांच्यासह उजास प्रकल्पात काम करणाऱ्या बचत गटातील महिला व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या पूनम ढोबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *