पैठण – जागतिक महिला दिनानिमित्त पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने “पत्रकार भवनात” पाच कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉ. उर्मिला चाकूरकर, शालिवाहन नागरी पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण, प्रसिद्ध समाजसेवक रामशेठ अहुजा आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे यांच्या हस्ते या महिलांना साडी-चोळी आणि गृहउपयोगी वस्तू भेट देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, रमेश शेळके, नंदकुमार चव्हाण, गौतम बनकर, मोहन ठाकूर, शिवाजी गाडे, मनोज खूटेकर, सुरेश वायभट, राहुल पगारे, दादा घोडके, ज्ञानेश्वर बावणे, विनोद लोहिया, शालिवाहन पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके, शिवाजी घोडसे, गणेश पवार, योगेश भुजबळ, अमोल धस आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने समाजातील कष्टकरी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन पत्रकार संघाने केले असून, यावेळी महिलांच्या हक्क आणि सन्मानावर विशेष चर्चा करण्यात आली.