वैजापूर : (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील निमगोंदगाव येथे संत जनार्दन स्वामी आश्रम मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त शिव पंचतन महायज्ञचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. मठाधिपती भोलीगिरी महाराज यांनी यज्ञाचे आयोजन केले होते.
या यज्ञामुळे परिसरात पर्जन्यवृष्टी होऊन शेतकऱ्याला आनंदाचे दिवस येतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, वन्य प्राण्यांना पाणी मिळेल व या कलियुगात संचारलेला कली यावर मात करण्याची शक्ती प्रत्येकाला मिळेल अशी या शिव पंचतन महायज्ञेची वैशिष्ट्य ठरले आहे. सुरुवातीला ओम नमः शिवाय नमः या मंत्राचा अकरा
लाख जप करून भगवान शंकराला आमंत्रित केले. त्यानंतर यज्ञास प्रारंभ झाला. भजन, कीर्तन, काकडा, शिवलीलामृत पारायण, जप, तप, हवन असे धार्मिक विधी संपन्न होत आहेत. नवतरुणांमध्ये निर्व्यसणीपणा अध्यात्माची ज्ञान राष्ट्राची सेवा गावाचा विकास मतभेद विसरून गावाला नवीन चालना विकासाकडे नेण्याचे काम या माध्यमातून होत आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
