भावसिंगपूऱ्यात मिस्तरीचा खून
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : भावसिंगपुरातील पेठेनगरात एका मिस्तरीचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि.१७) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. दगडू सदाफुले (वय ४४) रा. पेठे नगर भावसिंगपुरा असे खून झालेल्या मिस्तरीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू सदाफुले हे पेठेनगरात राहतात. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते पेठे नगरातील बनकर हॉल जवळून जात होते. तेव्हा अचानक आरोपींनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सदाफुले यांना छावणी पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता

. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी काही नातेवाईक घाटी रुग्णालयात पोहोचले. मात्र मयताचे जवळचे नातेवाईक आले नव्हते. त्यामुळे दुपारपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते, असे छावणी पोलिसांनी सांगितले.