छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) काल रात्री शिवूरबंगला या ठिकाणी आम्हाला फोन द्वारे माहिती मिळाली की गावामध्ये चोर आलेले आहे अशी माहिती मिळताच आम्ही स्वतः पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष ठोके, राहुल थोरात, आकाश बोरकर, सुरेश पवार आणि गाडीचा पाठलाग करत तलवाडा घाटापर्यंत पाठलाग केला येथे आरोपी यांनी एका ठिकाणी गाडी लावून शेताच्या दिशेने पळाले असता एका आरोपी नामे विष्णू रामभाऊ आकात वय २९ वर्ष राहणार सातवणा तालुका परतुर जिल्हा जालना यांनी विहिरीत उडी मारली दुसरा देवा सुभाष तावडे वय २० वर्ष राहणार पुंडलिक नगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे

त्यासोबतचा एक आरोपी आकाश गाडगे पूर्ण नाव माहित नाही राहणार पाचोड तालुका पैठण सराईत आरोपी नामे लक्ष्मण गाडे यांचा साथीदार तो पळून गेलेला आहे आम्ही सदरच्या कारवाईमध्ये एक एटीएम जसेच्या तसे त्यामध्ये कॅस किती आहे माहित नाही फुटलेल्या स्थितीत आणि स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतलेली आहे सदरचे एटीएम हे सटाणा रोड मालेगाव पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर काल रात्री फोडलेले आहे करिता आदरपूर्वक माहितीस्तव सविनय सादर