छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा डॉक्टरांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोज !

छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा डॉक्टरांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोज !

देशभरातील १००० हून अधिक डॉक्टर खेळाडू सहभागी होणार; तीन दिवसीय स्पोर्ट्स मेडिसिन परिषदेचेही आयोजन.

पब्लिकराज न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) छत्रपती संभाजीनगर शाखेने १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. आयएमए दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून १००० हून अधिक डॉक्टर खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये १३ खेळांचा समावेश आहे, ज्यात क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबल टेनिस, जलतरण, मॅरेथॉन, सायक्लोथॉन यासारखे विविध खेळ असतील. यासाठी शहरातील एमजीएम क्रीडा संकुल, सिडको क्रिकेट मैदान, गरवारे मैदान यांसारख्या प्रमुख ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. सहभागी खेळाडूंना वेलकम किट, सहभाग प्रमाणपत्र, आणि एमएमसी ६ क्रेडिट पॉईंट्स दिले जातील, तसेच विजेत्यांना सन्मान पदक प्रदान केले जातील.

तसेच, १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान द्योतन हॉल, एमजीएम मेडिकल कॉलेज येथे तीन दिवसीय स्पोर्ट्स मेडिसिन परिषद आयोजित केली जाईल, ज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर खेळाडूंना मार्गदर्शन करतील. या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन १५ नोव्हेंबर रोजी होणार असून त्याला आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर व्ही अशोकन, आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. क्रीडा स्पर्धेसाठी शासकीय विभाग, पोलीस, महानगरपालिका आणि विविध क्रीडा संघटनांकडून सहकार्य मिळत आहे, ज्यामुळे हे आयोजन अधिक स्मरणीय होईल. आयएमए छत्रपती संभाजीनगर शाखेच्या सचिव डॉ. विकास देशमुख यांनी सांगितले की, “या क्रीडा स्पर्धेचा मुख्य उद्देश डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे संरक्षण करत समाजाला एक चांगला संदेश देणे आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *