गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यात सध्या “चोर सोडून संन्याशाला फाशी” असा प्रकार घडत आहे. स्थानिक समाजसेवक भगवान बनकर यांनी गंगापूर तालुक्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून प्रतारणेचा प्रयत्न केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बनकर यांच्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणला गेला. त्या हल्ल्यातून ते सावरत नाही तोच, गंगापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीनुसार, बनकर यांनी सुहास वाकचौरे यांना धक्काबुक्की केली असा दावा करण्यात आला. मात्र, या आरोपांचा फोलपणा एका व्हायरल व्हिडिओमुळे उघड झाला. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की, अधिकारी स्वतःच बनकर यांना

अरेरावीची भाषा करत आहेत आणि त्यांना धक्काबुक्की करून बाहेर ढत आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून गंगापूरमधील भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हे समोर आले आहे. भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणूनच भगवान बनकर यांच्यासारख्या समाजसेवकाला अडचणीत आणण्याचे हे षड्यंत्र असल्याचे स्थानिकांत चर्चा आहे. सत्य जरी दडपण्याचा प्रयत्न झाला, तरी ते कधीच हरत नाही. गंगापूर तालुक्यात न्याय मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.