निकृष्ट पोषण आहारामुळे अंगणवाडीताईंच्या डोक्याला ताप
कन्नड : कन्नड तालुक्यात अंगणवाडी बालके व स्तनदा माता यांचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत आहे. परिणामी, या पोषण आहाराकडे बालकांचे पालक व स्तनदा माता यांनी पाठ फिरविल्याने अंगणवाडीताईंची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. शासन स्तरावरून ० ते ६ महिन्यांच्या गरोदर महिला आणि बालकांना मूगडाळ खिचडी, तूरडाळ खिचडी व सुकडीचे पाकीट असा बंद आहार दिला जातो. शासनाने पाठविलेला हा आहार खराब आहे की नाही ते घरी गेल्यावर पाकीट फोडल्यावरच कळते

. तालुक्यात प्रकल्प एक व अंतर्गत ५२२ अंगणवाड्या असून, यामध्ये १३ हजार ८४१ बालके व ५ हजार ६५ स्तनदा माता यांना ३७ हजार ७८२ पाकिटांतून पोषण आहार पुरविला जातो. मे व जून महिन्याचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने पडून आहे. त्यातच भर म्हणजे जुलै व ऑगस्ट या पुढील दोन महिन्यांचा आहार अंगण…
: गराडा येथील अंगणवाडीत पोषण • आहारासाठी आलेल्या खिचडीच्या पाकिटांमध्ये किडे लागलेली डाळ दिसून आली. आम्ही प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवून पंचनामा केला. शासनाने बालकांना चांगला पोषण आहार द्यावा रविंद राठोड, नागद सर्कल विभागप्रमुख, शिवसेना (शिंदे गट) संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेसाठी आहे. पोषण आहाराबाबत खूप तक्रारी आलेल्या आहेत, याविषयी मी वरिष्ठांना कळविले आहे.
.