खुलताबाद {प्रतिनिधी सविता पोळके} ; वेरूळ येथील नाथ आश्रम येथे दि ८ मार्च शनिवार रोजी सकाळी १०ते १२ या वेळेत काल्याचे , किर्तन रुपी सेवेत अडबंगनाथ संस्थान प्रमुख भामाठाण सद्गुरु अरुणा गिरीमहाराष्ट्रभरजी महाराज यांनी या ठिकाणी आलेल्या भाविकांना हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी महाराष्ट्रभर चालू असलेल्या विद्यार्थ्यांची गुरुकुल व आक्काताई महाराज यांनी वेरूळ या ठिकाणी नाथ आश्रम मध्ये विविध विकासात्मक कामांची सुरुवात येणाऱ्या भक्तांसाठी केलेली असून त्यासाठी प्रत्येक भक्तांनी या कामासाठी आर्थिक मदत करा असे आपल्या कीर्तनातून अरुणात गिरीजी महाराज आपल्या कीर्तनादरम्यान आलेल्या सर्व भाविकांना भावनिक होऊन आवाहन केले.
या ठिकाणी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या विशेष सहकार्यातून चालू असलेल्या मदत कार्याबद्दल व शेवटच्या दिवशीच्या काल्याचा महाप्रसाद या ठिकाणी भाविकांसाठी दिल्याबद्दल नाथ आश्रमाच्या वतीने सद्गुरु आक्काताई जी महाराज व सर्व नाथ भक्त मंडळींच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले

. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एल जी गायकवाड, वेरूळ गावचे सरपंच कुसुमताई प्रकाश मिसाळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष राधाकिसन बापू पठाडे, माजी सभापती अर्चना दिनेश अंभोरे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील नलावडे ,माजी सभापती भीमराव खंडागळे , माजी उपसभापती दिनेश अंभोरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ,फुलंब्री पंचायत समिती माजी सभापती विवेक बापू चव्हाण ह भ प नारायण महाराज भांबर्डे ,अरुण आघाडे, सोमीनाथ जाधव, संदिप अधाने, रेखा चव्हाण,तालुका सरचिटणीस सतीश दांडेकर, बाळु नलावडे ,संतोष गायकवाड, अनिल करपे, गणेश सावजी,इंदापूर ग्रामपंचायत चे सरपंच संदीप पाटील निकम ,माजी नगरसेवक परसराम बारगळ , संजय खंडागळे, सुखदेव ठेंगडे,कैलास मिसाळ, आचारी सेवा काय बाबासाहेब भाऊ घुगे, मंडप सेवा विजय मंडप बोरसे दामू गवळी अण्णा, अरुण कदम पुंजाराम धोत्रे गणेश गायके मते मामा विठ्ठल गोम लाडू . पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत हातनूर या ठिकाण च्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले . या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर येथून आलेल्या प्रसिद्ध भारुडकार ज्येष्ठ पत्रकार ह भ प नारायण महाराज भांबर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारुडात भाग घेतला.( नाथ आश्रम वेरूळ येथे दि १ मार्च ७ मार्च दरम्यान संगीतमय भागवत कथेचा भव्य प्रकारे सद्गुरु आक्काताई महाराज व, सर्व नाथ भक्त यांच्या पुढाकारातून कथा प्रवक्ते अशोक महाराज घुंमरे सावंगी नाशिक यांच्या माध्यमातून सात दिवसाची सेवा मोठ्या उत्साहात पार पडली ज्या भाविकांनी भागवत कथा श्रवण केली त्या भाविकांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन घुमरे महाराज म्हणाले) काल्याचे किर्तन अरूणाथगिरिजी महाराज यांच्या अमृत वाणीतून संपन्न झाले.