यंदा प्रतिकूल हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. टी बोर्ड ऑफ इंडिया च्या आकडेवारीनुसार यंदा चहाच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात हवामानाचा फटका बसला आहे. मे महिन्यात चहाचे उत्पादन घटून ते ९,०९ कोटी किलो वर आले आहे साहजिकच देशात जवळपास चहाच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. ही बातमी नुकतीच वाचली गेल्या दहा वर्षातील चहाच्या उत्पादनाचा हा नीचांक आहे विशेष म्हणजे चहाच्या किमतीत वाढ झाल्याने चहाच्या कंपन्यांमध्ये शेअर ची किंमत मंगळवारी तब्बल १६ टक्क्यांनी वाढली. जय श्री टी अँड इंडस्ट्री मक्लिओड रसेल इंडिया, व रोशेल इंडिया या त्या चहाच्या कंपन्या होत २०२४ च्या सुरवातीला चहाचे उत्पादन कमी असूनही निर्यातीत मात्र ३७ टक्के वाढ झाली आहे. इजिप्त, इराण, इंग्लंड इराक या देशात चहाची निर्यात होते

. प्रचंड उष्णतेमुळे चहाच्या रोपाला फटका बसला. आसाम सारख्या भागात पुरामुळे पिकाचे नुकसान झाले. दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस न पडल्याने पीक कमी आले. या शिवाय केंद्र सरकारने उत्पादक प्रदेशात २० कीटक नाशकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे त्यामुळे उत्पादन कमी झाले एकूणच यंदा चहा महागला असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होणार आहे. आज सर्वसाधारणपणे प्रत्येक कुटुंबात चहा घेतला जातो याशिवाय अनेक कंपन्या व ऑफिसेस मध्ये चहाचा खप मोठा आहे . या सर्वाना चहाच्या कमी उत्पादनाचा फटका बसणार आहे आज चहा न घेणारी व्यक्ती क्वचितच आढळते त्यामुळे याची झळ सर्वानाच बसणार आहे हे निश्चित आता चहा कमी करावा किंवा तो थोडा घ्यावा हाच यावरचा उपाय असू शकतो असे वाटते