खुलताबाद (प्रतिनिधी सविता पोळके) : श्रावण मासाच्या दुसऱ्या सोमवारी (ता.१२) खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात गर्दीचा फायदा घेत येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र आणी ३५ हजार रूपये रोख रक्कम लंपास केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार उषा बंडू आप्पा मुळे (वय ६५ वर्ष) राहणार शिवाजीनगर छत्रपती संभाजी नगर यांच्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने पर्स मधील पाच ग्राम सोन्याची पोत व पसतीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती

गुप्त बातमीदारा मार्फत माहितीच्या आधारे मंदिर परिसरात शोध घेतला असता १) निकिता युवराज जगधने वय २१ वर्ष राहणार अंधानेर तालुका कन्नड, २) ज्योती तात्याराव खाजेकर वय ३० वर्ष राहणार अंधानेर तालुका कन्नड, ३) आरती सुरेश शिंदे वय ३५ वर्ष राहणार कासाबखेडा तालुका खुलताबाद यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून पाच ग्रामची सोन्याची पोत आणी ३५०००/- रोख रक्कम हस्तगत करून वरील आरोपी खुलताबाद विरुद्ध पोलीस ठाणे