खुलताबाद तालुका प्रतिनिधी :सविता पोळके ; खुलताबाद तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुलीभंजन /नंद्राबाद येथील सरपंच /ग्रामसेवक यांच्या हस्ते आशा कार्यकर्त्यांगटप्रवर्तक यांना 15 वा वित्त आयोगातून मोबाईल फोन खरेदी करून देण्यात आले.गावातील घरोघरी जाऊन ऑनलाईन सर्वे करणे आशा कार्यकर्त्यांना फार अवघड जात होते परंतु ग्रामपंचायत ने त्यांच्या कामाची गांभीर्यानेदाखल घेऊन काल दिनांक 22 फेब्रुवारीरोजी ग्रामसभेत स्मार्ट फोन चे वाटप केले त्याप्रसंगी गावाचे सरपंच सौ. विशाखा ताई जाधव, ग्रामपंचायत अधिकारी श्री.एस. बी.बनसोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, देविदास बागुल,शितल सोनवणे, पूजा घाटे, ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी व सर्व आशा कार्यकर्त्यां, अंगणवाडी सेविका मदतनीस आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
