सिल्लोड :- विद्यार्थ्यांनी ग्रंथाचे वाचन करून आचरण केल्यास समाजाची सामाजिक शैक्षणिक प्रगती ही होणारच यामध्ये कसलीही तीळ मात्र शंका नाही यासाठी विविध ग्रंथाचे वाचन करून व्यसनांपासून कायमचे दूर राहून समाजाची प्रगती करावी असे प्रतिपादन मातंग समाजाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमितजी गोरखे यांनी दोन दिवशीय भव्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे.
टिळकनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ग्रंथालय, मातोश्री गयाबाई साबळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले होते. ग्रंथालयाचे संचालक प्रा अनिल साबळे, डॉ सचिन साबळे यांच्यावतीने पिंपरी चिंचवड येथील मातंग समाजाचे नवनिर्वाचित युवा आमदार अमितजी गोरखे यांचा सत्कार सिल्लोड येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आमदार अमितजी गोरखे यांनी सांगितले की ग्रंथालयाच्या वतीने वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक विधायक कार्यक्रम आयोजित करतात याबद्दल याबद्दल ग्रंथालयाचे संचालक, अनिल साबळे, डॉ सचिन साबळे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. टिळक नगर येथे मातोश्री गयाबाई साबळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वाचकांना विविध ग्रंथ वाचनासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते . याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. सचिन साबळे, प्रा अनिल साबळे, भगवान राऊत, प्रशांत साबळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुचेकर ,संदीप मानकर, गजानन मानकर, गजानन आव्हाड, प्रकाश मिसाळ,आनंद राऊत, ग्रंथपाल स्नेहल साबळे, मीनाताई राऊत, आदींची उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या या मोफत ग्रंथ प्रदर्शनास अनेक वाचकांनी विविध ग्रंथाचे वाचन करून लाभ घेतलेला आहे.