गेवराई बु.येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूरी आदेशाचे वितरण !

गेवराई बु.येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूरी आदेशाचे वितरण !

बीड : दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत गेवराई बुद्रुक तालुका पैठण जिल्हा छ.संभाजीनगर येथे आदरणीय प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या विकसित भारत या संकल्पनेतून केंद्रीय गृह मंत्री मा.अमित शहा साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब, व श्री.अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वात, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत घरकुल मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वितरण व ग्रामविकास विभाग मार्फत प्रथम हप्ता ऑनलाईन वितरणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर सरपंच प्रतीक्षा आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक तथा घरकूल विभाग प्रमुख श्री देविदास गवळी, ग्रामपंचायत अधिकारी रमेश जाधव, प्रभाकर आगलावे आणि भारतीय जनता पार्टीचे बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक, माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, तथा ग्रा.पं.सदस्य गजानंद बोहरा यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांचे स्वागत, प्रशिक्षण, मान्यवरांचे स्वागत आणि मार्गदर्शन, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्यात आले आणि लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. या विशेष ग्रामसभेत गेवराई बुद्रुक अंतर्गत 49 लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्र देण्यात आले.

आज महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण राज्यात 20 लाख लोकांना घरकुल वाटप करण्यात आले तर 10 लाख लोकांना प्रथम हप्त्याचे 15 हजार रुपये थेट बँकेच्या खात्यात देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गवळी साहेबांनी लाभार्थ्यांना घरकुल योजनेविषयी तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा सांडपाणी आणि गावे मॉडेल व्हिलेज बाबत सविस्तर माहिती दिली तसेच गजानंद बोहरा यांनी ग्रामस्थांना घरकुल बांधकाम सुरु करून पूर्ण करा अर्धवट काम करू नका अशी विनंती केली व सविस्तर अशी माहिती दिली उदा. या योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्याला स्वतःची जागा नसेल तर त्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय अर्थ सहाय्य मधून निकष पूर्ण केल्यास त्याला तालुका स्तरावरील समिती कडून वेगळे 1 लाख रुपये पण मिळू शकतात तसेच शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असेही आवाहन गजानंद बोहरा यांच्याकडुन जनतेला करण्यात आले. यावेळी सुभाष राठोड, ब्रम्हदेव राख महाजन महेर सतीश राख परमेश्वर घोरपडे साईनाथ आगलावे, रघुनाथ चव्हाण, सर्व लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *