सोयगाव प्रतिनिधी / सोयगाव तालुक्यातील पिंपळवाडी येथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या गिरडाघाटात धनिक मायक्रोफायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्यांना गिरडा घाटात दरोडेखोरांनी लुटून मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. १०/६/२४ रोजी जूनच्या रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळ गिरडा सावळदबारा गावापासून ६ ते ७ किलोमिटर अंतरावर असून ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येते.
प्राप्त माहितीनुसार पंजाब थिगळे, धीरज शातम आणि संघानंद इंगळे हे धनिक मायक्रोफायनान्स चे कर्मचारी काल, १० जून रोजी टिटवी,सावळदबारा परिसरात कर्ज वसुलीसाठी गेले होते

. रात्री बुलडाणा येथे परत जात असताना त्यांना उशीर झाला. तिघे दोन मोटरसायलने बुलडाण्याकडे जात होते. दरम्यान टिटवी येथून काही जणांकडून कर्ज वसूल करून तिघे गिरडा घाट चढून वर येत होते. त्याचवेळी घाटातील महादेव मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या ५ ते ६ जणांनी तिघांवर एकाकाकी हल्ला चढवला. हल्लेखोरांजवळ लोखंडी रॉड होते. या हल्ल्यात धीरज शांतम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलडाण्यात उपचार सुरू आहेत. कर्जवसुली करून आणलेली पैशाची
एक बॅग पंजाब थिगळे यांच्याजवळ होती, त्यामुळे पंजाब थिगळे
यांनी दरोडेखोरांच्या तावडीतून निसटून जंगलात पळ काढला त्यामुळे दरोडेखोरांनी थिगळे यांचा पाठलाग केला आणि पैशाची बॅग आणि मोबाईल बळजबरीने हिसकावून दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले आहे.पुढील तपास सपोनि प्रफुल्ल साबळे हे करीत आहेत.