फोन वर माहिती का विचारली म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी.
पैठण : { प्रतिनिधी : शिवनाथ दौंड } तालुक्यातील पारुंडी तांडा येथील शेतकरी श्याम गबरू चव्हाण यांची तिन ते चार महिन्याची गाभण गाय अंदाजे किंमत 25 ते 30 हजार ही रानातून चरून घरी येत असतांना घराजवळ डांबर रस्त्यावर पाय घसरून पडल्याने पायाला सूज यायला लागली होती. अश्यातच त्यांनी अडुळ परिसरात असलेले डॉक्टर यांना कॉल करून सांगितले पण ते बाहेर पेशंट साठी गेले होते मग त्यांनी पैठण जणवराच्या फिरते पथक ऍम्ब्युलन्सला कॉल करून बोलून घेतले.असता त्यांनी डिझेल कमी आहे त्यामुळे येता येणार नाही
असं सांगत टाळण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्याच्या आग्रहाला मान देऊन व काही जास्त पैशाची मागणी करून ऍम्ब्युलन्स काही वेळात हजर झाली त्यांनी येऊन ट्रेंटमेन्ट प्लास्टर करून निघून गेले. पण प्लास्टर करत असताना डॉक्टर यांच्या लक्षात राहिले नाही. की आपण जी तार बांधतो ती बाहेरून बांधायला पाहिजे त्यांनी प्लास्टर च्या बाहेरून बांधण्यात येणारा तार वायर आत शरीराला चिकटून बांधल्याने ती लोखंडी तार आतमध्ये घुसून गाईचा पाय पूर्ण खराब झाला व त्यात आठ दिवसात पूर्ण किडे पडलेले दिसून आले. डॉक्टर सातोटे हे कॉल उचलत नसल्याने शेतकऱ्याने नाईलाजाने आडुळ परिसरातील पशुसवर्धन अधिकारी डॉक्टर आश्विनी राजेंद्र यांना कॉल करून सांगितले त्यांनी त्यांनी पण स्वतः लक्ष न देता प्रायव्हेट डॉक्टर यांना पाठवले आता त्या जनवराचा पाय काढावा लागेल अशी माहिती. प्रायव्हेट डॉक्टर यांनी सांगितली. पैठण तालुक्याला मिळालेली जनावरांची ऍम्ब्युलन्स व्हॅन यावरील डॉक्टर विकास सातोटे यांनी ही चुकीची ट्रेंटमेन्ट केल्याने जनावरांना जिव किंवा पाय गमवायची वेळ आलेली आहे. डॉक्टर यांनी शेतकऱ्याला असे सांगितले होते की पंधरा दिवस प्लास्टर राहूद्या.पंधरा दिवसांनी प्लास्टर उघडले असता लोखंडी तार आत शरीरात घुसून पूर्ण जखमा झालेल्या दिसून आल्या त्यांना या विषयी फोन केला असता डॉक्टर सातोटे हे म्हणतात की हा माझा प्रायव्हेट नंबर आहे.
यावर फोन करू नका तुम्ही मला फोन केला पैशाची मागणी केली.असा मी गुन्हा दाखल करेल मला माझ्या प्रायव्हेट नंबर ला कॉल केला म्हणून मी तुमच्या विरोधात सरकारी कामात अडथळा अशी खोटी केस दाखल करणार आहे. अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विकास सातोटे यांनी पत्रकाराला देऊन फोन वर धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरा दिवसापूर्वी डॉक्टर यांना ट्रेंटमेन्ट करताना डिझेलच्या साठी 1400+मेडिकल साठी 2300 घेतले व नगद 2500 घेतले असे एकूण सहा हजार रुपये घेऊन गेले असं जनावर मालक श्याम गबरू चव्हाण यांनी सांगितलं.