पैठण (प्रतिनिधी) : दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रुप ग्रामपंचायत गेवराई बुद्रुक येथे रयतेचे राजे, आदर्श व पराक्रमी राजे, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, आर टी आय कार्यकर्ते, युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मा.श्री.गजानंद बोहरा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती उत्सवाला अध्यक्षस्थानी मा.श्री.नरहरी पाटील आगलावे, रेवन आप्पा आगलावे, पत्रकार नारायण आगळे, मा.उपसरपंच नवनाथ आगळे हे होते, तर पाचोड पोलीस स्टेशनचे एपीआय मा.शरदचंद्र रोडगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार केंद्रे साहेब, पोलीस पाटील राख साहेब यांनी बंदोबस्त दिला

या जयंती उत्सवात कृष्णा आगळे, अमोल आगलावे, विठ्ठल आगळे, सोमनाथ आगळे, साईनाथ आगळे, रामदास आगलावे, आकाश आगलावे, दीपक आगळे, अनिल गवारे, आकाश ह.आगलावे, दीपक राख, महेश भोसले, हनुमान आगळे, बंडू आगळे, नारायण आगलावे, निवृत्ती आगलावे, पुंजाराम आगळे, तसेच सर्व तरुण मंडळी, आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.