.पैठण ; दि.१९ सप्टेंबर २०१४ रोजी होनोबाची वाडी ता.पैठण जि.छ.संभाजीनगर येथे भाजपा इंटेलेक्चुअल सेलचे जिल्हाअध्यक्ष श्री.गजानंद बोहरा यांच्या पुढाकाराने प्रकल्प निरामय (हुमाना पीपल टु पीपल इंडिया) या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. हुमाना संस्थेकडून होनोबावाडी अंगणवाडी मध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, क्षयरोग आणी ईतर सामान्य तपासणी करण्यात आली व सर्वांना जनजागॄती करत या आजारांविषयी माहिती सांगन्यात आली

. यामध्ये आहारतज्ञ मेघा ताकभाते व आरोग्य पर्यवेक्षक भुदेवी गोरकल्लू यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब ची तपासणी केली तसेच आहारतज्ञ मेघा मॅडम यांनी पौष्टिक आहार कसा घेतला पाहिजे व पौष्टिक आहार घेऊन आजारांपासून कसा बचाव आपण करू शकतो यावर सविस्तर मार्गदर्शन करून आहारतक्ता देण्यात आला. या प्रसंगी होनोबावाडीचे ग्रामस्थ आशा कार्यकर्ती मंगल वैष्णव तसेच गावातील लाभार्थी उपस्थित होते.