पूर्णा, जि. परभणी – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गजानंद बोहरा यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी महाराष्ट्र यांच्या वतीने हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला मा. पंकज पवार (उपअधीक्षक, भूमी अभिलेख अकोला), मा. विठ्ठल भुसारे (शिक्षणाधिकारी, वाशिम), प्रा. श्रीकांत सोनवणे (समन्वयक, च. च. महा. मु. वि. नाशिक), डॉ. अनिल आठवले (मुख्य संपादक), सलीम सू. सय्यद (कार्यकारी संपादक) आणि सलीम सय्यद सुहागनकर (जिल्हा प्रतिनिधी, परभणी)

आदी मान्यवर उपस्थित होते. गजानंद बोहरा यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले व त्यांना निरोगी व यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.