गंगापूर भ्रष्टाचार प्रकरण: सीईओ विकास मीना यांच्याकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न?

गंगापूर भ्रष्टाचार प्रकरण: सीईओ विकास मीना यांच्याकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न?

गंगापूर (प्रतिनिधी). : गंगापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नरहरी राजनगाव-पिपरी येथे सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात निर्मला भालेराव यांनी जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन करत आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या या लढ्याला चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र ही समिती निष्क्रिय ठरली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली फक्त चिरीमिरी घेण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत.या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि निधीची उधळपट्टी झाल्याचे उघड झाले असून, भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या निर्मला भालेराव आणि भगवान बनकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुहास वाघचौरे याने हा कट रचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या हल्ल्यात भगवान बनकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुहास वाघचौरे, ग्रामसेवक धनवयी मुळे, गादु भोंडवे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या कामकाजात झालेल्या चौकशी अहवालानुसार, दलित वस्तीत मोठ्या प्रमाणात निधी गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लेखी दस्तऐवज आणि अहवालांमध्ये ग्रामसेवक शिवाजी पवार वाघ, माजी सरपंच संतोष नाईक, शाखा अभियंता, इंजिनीअर आणि गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे हे प्रमुख आरोपी असल्याचे सिद्ध झाले आहे.चौकशीला पारदर्शकता देण्याऐवजी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे समर्थन करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण तपासच मोडीत काढला गेला. ग्रामपंचायत सदस्य सुनील मस्के यांनी या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवून गावाच्या अब्रूची लाज राखली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महाघोटाळा बाहेर आला आणि ग्रामस्थांनी प्रशासनावर कारवाईसाठी दबाव आणला.सीईओ विकास मीना यांच्याकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न?

मुख्य सूत्रधार गंगापूर बी .डि .ओ सुहास वाघचौरे


या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे स्पष्ट असतानाही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी ते चौकशी दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.जर प्रशासन दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर याला लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार मानला पाहिजे. जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर हल्ले होत असताना प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. ग्रामस्थांनी जर योग्य न्याय मिळाला नाही, तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

“भगवान बनकर यांच्यावर भ्रष्टाचार उघड केल्यामुळे प्राणघातक झालेला झाला त्याच भ्रष्टाचारातील चांडाळ चौकडी”

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *