गंगापूर. : (प्रतिनिधी); तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व दलित पत्रकार भगवान बनकर यांनी साखळी उपोषण दरम्यान मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला होता. या भांडाफोडीमुळे त्रस्त अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला घडवून आणला. हल्ल्याच्या तपासात गंगापूर बीडीओ आणि सोयगाव गटविकास अधिकारी अहिरे, रांजणगावचे माजी ग्रामविकास अधिकारी शिवाजी पवार, धनवईचे डाहोरे आणि इतर संबंधित अधिकारी नामांकित आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या भगवान बनकर यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना हे आरोप केले.

सामाजिक कार्यकर्ते आणि भगवान बनकर यांच्या कुटुंबाने अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी त्वरित कारवाई केली जावी, अशी मागणी समाजातून जोर धरू लागली आहे. तसेच, पोलीस प्रशासनाकडून पारदर्शक आणि योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी उपोषणकर्त्या निर्मला भालेराव यांच्याकडून देखील करण्यात आली आहे.