गंगापूर (प्रतिनिधी : लक्ष्मीकांत माघाडे) गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे छत्रपती संभाजीनगर ते पुणेे महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या बसने मोटरसायकला जोराची धडक दिली यामध्ये एक ठार दोन जखमी झाले सदर विद्यार्थी हे न्यू हायस्कूल ढोरेगाव येथे बारावी मध्ये शिकत होते.छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथे एस टी महामंडळाच्या फलटण डेपोच्या बसने मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने एक विद्यार्थी जागेवरती ठार झाला असून दोन गंभीर जखमी आहे. त्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे हे तीनही विद्यार्थी न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगाव येथे बारावीत शिक्षण घेत होते.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ढोरेगांव येथील कॉलेज सुटल्यानंतर एका मोटर सायकल वरून तीन विद्यार्थी ढोरेगाव रस्ता क्रॉस करत असतानी अचानक मध्यभागी आले असता छत्रपती संभाजीनगर वरून पुण्याकडे जाणाऱ्या एम एच १४ बी टी २७९७ बस गाडीने मोटारसायकल क्रमांक एम एच २० ई यु ७१५४ ला जोरदार धडक दिली यामध्ये दोन विद्यार्थी फेकल्या गेले तर एक बसच्या खाली मोटरसायकल सह तब्बल 100 फूट फरपटत गेला. या मध्ये किरण दत्तात्रेय काजळे (१९) रा:आनंदवाडी हा विद्यार्थी जागेवर ठार झाला असून, गौरव संतोष मिसाळ (१९)
गौरव संजय सुखदान (१९) दोन्ही राः भोयगाव हे गंभीर जखमी आहे.यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी विशाल जोशी, सरपंच अयुब पटेल,ग्रामपंचायत सदस्य मुकतार पटेल, राजु जोशी, दिपक वने यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य केले. नेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक झोरे, राहुल वडमारे, विष्णु बाप्ते यांनी घटनास्थळी येऊन बसला रस्तेच्या कडेला घेऊन ट्राफिक सुरळीत केली. तर विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण, आगार प्रमुख विठ्ठल
धुतमल, वाहतूक नियंत्रक भाऊसाहेब जाधव, वाहतूक क्लार्क नारायण शेळके, आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
