गंगापूर : तालुक्यातील टोकी ते आंबेगाव या दोन गावांना जोडणाऱ्या प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत काम प्रगती पथावर आहे.
याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला काहीं शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता शेतकऱ्यांचा कर्दन काळ ठरतो आहे. आधीच या भागात शेतकऱ्यांच्या जमिनीत पावसाचे पाणी मोठ्यप्रमाणावर साचले आहे. शेतातील उभी पिके जास्त पाण्या मुळे सडत आहे. या मुळे शेतकरी चिंतातुर आहे. त्यातच या रस्त्याच्या मधोमध आडवे पाईप टाकण्याचा घाट घालण्याचा प्रकार संबंधित प्रशासनाकडून होत आहे. यात टोकि या गावच्या शेतकऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला हे पाईप टाकण्यासंबंधी विरोध केला आहे. यावर संबंधित कॉन्ट्रॅक्टर चे म्हणणे आहे की यासंबंधी आमच्याकडे पत्र आहे. त्या पत्राची प्रत मागितले असता वेळ मारून नेण्याचे काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर व इंजिनिअर यांनी केले. यास काहीं ग्रामपंचायत प्रशासनात फुकटची लीडर की करणारे खोडसाळ लोकांचा हात असल्याचे समजले
. या गाव पातळीच्या वयक्तिक राजकारण व कुरघोडी चे बळी येथील सामान्य शेतकरी ठरतो आहे. प्रत्यक्षात एका शेतकऱ्याच्या वस्तीवर राहत असल्याने अखी वस्ती पाण्यात आहे. त्याचे कांदे आणि धान्य सडले आहे. नैसर्गिक ओढे, नाले गावठाण नकाशा प्रमाणे असेल तर त्या वर पाईप टाकून छोटे पुल बांधले जाऊ शकतात. परंतु या संबंधित रस्त्यालगत कुठलाही नैसर्गिक ओढा किंवा नाला नसतांना अश्या प्रकारे पाईप टाकून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाण्याचा ओघ काढण्याचा घाट घातल्या जात आहे. यास ग्रामपंचायतच्या कामात व काहीं अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोडसाळ पणाने हे कृत्य काही दोन-चार लोक करीत आहे. असे चर्चे दरम्यान समजले.