छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : गंगापुर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याच्या गंभीर आरोपांबाबत २६ डिसेंबर २०२४ पासून सुरू केलेल्या अमरण उपोषणावर प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घोटाळ्याचे पर्दाफाश होऊ नये म्हणून एकमेकांचे पाठीशी घातले असून, या प्रकरणावर चौकशी न करता, तक्रार करणाऱ्यांना धमक्याही दिल्या आहेत. या तक्रारीदारांना रात्री “तुम्ही तक्रार मागे घ्या, नाहीतर तुम्हाला धोका होईल” असे धमकी देण्यात आली असून, उपोषण मागे घेण्याचा दबाव देखील निर्माण केला जात आहे. याविरोधात तक्रारीदारांनी ३१ डिसेंबर २०२४ पासून उपोषण साकळीत रूपांतरित केले, परंतु त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम राहिले. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गंगापुर पंचायत समितीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कोणतीही कारवाई केली नाही, परिणामी गंगापुर पंचायत समितीतील गटविकास अधिकारी सुहास वाघचौर, एस. एन. पाटील, यु. सी. भोंडवे, जी. पी. धनवई, के. आर. गादुर, गौतम तेलंग आणि पुंगळे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे दोष लपवण्यासाठी, उपोषण करणाऱ्यांना तात्काळ धोक्याच्या धमक्या देत, त्यांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

आज, या संपूर्ण प्रकरणाच्या निष्क्रियतेमुळे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजास्थाक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रशासनाची निष्क्रियता आणि भ्रष्टाचारावर त्यांची आंख उचलणे, या सर्व आरोपांनी गंगापुर तालुक्यात असंतोष निर्माण केला आहे. यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.