खुलताबाद शहरातील नव्या जलयोजना आणि रस्त्याच्या दुरुस्तीच्या दर्जाबाबत चिंता, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

खुलताबाद शहरातील नव्या जलयोजना आणि रस्त्याच्या दुरुस्तीच्या दर्जाबाबत चिंता, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

खुलताबाद (प्रतिनिधी सविता पोळके) : शहरातील नव्या जलयोजना आणि रस्त्याच्या दुरुस्तीच्या दर्जाबाबत चिंता, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर खुलताबाद शहरात येसगाव ते खुलताबाद दरम्यान सुरू असलेल्या नव्या जलयोजनेचे तसेच मुख्य रस्त्याच्या बांधकामाचे काम समाधानकारक दर्जाने होत आहे का, याबाबत आता नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असून या कामांची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करत मंगळवारी नगर परिषद मुख्याधिकारी शेख समीर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जलयोजनेचे काम शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार व प्रमाणित साहित्याचा वापर करून होत आहे की नाही, हे तपासावे. यासोबतच भविष्यात फुलंब्री रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान पाइपलाइनवर परिणाम होणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. ही योजना तब्बल ४५ वर्षांनंतर मंजूर झालेली असून, त्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत उच्च असावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहेमुख्य रस्त्यावरील पाइपलाइन पूर्ण झाली आहे की नाही याची विशेष तपासणी करावी, जेणेकरून भविष्यात वारंवार रस्ता खोदण्याची गरज भासू नये. तसेच नागरिकांच्या घरांपर्यंत पाइप जोडणी व्यवस्थित झाली पाहिजे, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. साथच लोकनिर्माण विभागाचे उप अभियंता यांना मुख्य रस्त्याच्या एस्टीमेटनुसार रुंदीकरण व रस्ता बांधकामात दर्जा राखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे

. शहरातील आजमशाहीपुरा परिसरात नगर परिषद हॉल समोरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता आणि शहरातील इतर महत्वाच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच शहरात स्वच्छता राखण्यासाठी अधिकारी आठवड्यातून एकदा स्वतः पाहणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर दरगाह कमिटी हद्दे कला अध्यक्ष एजाज अहमद, दरगाह कमिटी हद्दे खुर्द अध्यक्ष शरफोद्दीन मोहम्मद रमजानी, माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन, माजी नगरसेवक मुनीबोद्दीन, कमरोद्दीन नवाब, अॅड. शब्बीर अहमद, फकीर मोहम्मद कुरेशी, नईम बक्ष व सलीम जागीरदार यांच्या सह्या आहेत.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *