खुलताबाद, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नव निर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी श्री क्षेत्र वेरूळ येथे मंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन दर्शन घेतले. कृतज्ञता पूर्व भेट घेतली. भेटी दरम्यान शांतिगिरी महाराज यांनी ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करताना प्रामुख्याने घृष्णेश्वर देवस्थान, मालोजीराजे भोसले गढी, येळगंगा घाट यासाठी विशेष कॉरिडॉर निर्माण करून त्याचा विकास करावा असे सांगितले तेव्हा या सूचनेची वरिष्ठ पातळीवर ताबडतोब बैठक लावून प्रत्यक्ष कारवाईचा त्यांनी शब्द दिला

. पुढील कार्यासाठी शांतिगिरी महाराजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार, अविर मुक्तेश्वर महाराज, शिवा भाऊ, एकनाथ होळकर, जनार्दन रिठे, राजू चव्हाण, भाऊसाहेब उगले, कैलास कुराडे, श्रीकांत बोडके व नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, अहिल्यादेवी नगर, जालना, मुंबई या ठिकाणचे जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.