जळगाव पाचोरा (प्रतिनिधी) दिनांक २२/०५/२०२४ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मंजाबाई भोई हिच्य चुलत नातवाने म्हणजे मयत मंजाबाई भोई हीच्या बहिणीच्या मुलीच्या मुलाने पिंपळगाव हरेश्वर येथील दरमहा चाळीस टक्के व्याजदराने सावकारी करणाऱ्या वैभव खाटीक या सावकाराकडून घेतलेले कर्ज परत करण्यासाठी सावकाराने तगादा लावला होता म्हणून संशयित आरोपी विशाल भोई याने मंजाबाई भोई हीच्या अंगावरील सोन्या,.चांदीचे दागिने काढून घेत आपण केलेली चोरी उघड होऊ नये म्हणून मंजाबाई भोई हिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडल्यानंतर
सुध्दा ज्या सावकाराने विशाल भोई याच्यामगे तगादा लावला होता त्या सावकारावर अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

हे प्रकरण ताजे असतांनाच पिंपळगाव हरेश्वर येथीलदिपक प्रदिप गरुड या तरुणाने अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे इमेल द्वारा तक्रार केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पिंपळगाव हरेश्वर येथील तक्रारदार दिपक प्रदिप गरुड या तरुणाने दिलेली माहिती अशी की (गरजवंताला अक्कल थोडी) या प्रसंगानुसार दवाखान्याच्या खर्चासाठी दोन महिन्यांपूर्वी मी पिंपळगाव हरेश्वर येथील अवैध सावकारी करणाऱ्या वैभव खाटीक कडे स्वमालकीची एम. एच. १९ ई. ई. ०३३४ या नंबरची पल्सर कंपनीची दुचाकी गहाण ठेवून ४०% दरमहा व्याजाने ३५०००/०० रुपये रोख रक्कम घेतली होती. वैभव खाटीक याच्याकडून घेतलेल्या ३५०००/०० रुपये मुद्दल रकमेवर दिपक प्रदिप गरुड हा दरमहा १४०००/०० रुपये व्याज नियमितपणे दोन महिन्यांचे २८०००/०० रुपये व्याज देऊन टाकले आहे.तसेच माझ्याकडे पैसे उपलब्ध असल्याने मी काही दिवसांपूर्वी वैभव खाटीक याच्याकडून घेतलेले ३५०००/०० रुपये व इतर व्याजाची रक्कम वैभव खाटीकला परती देऊन दिली आहे. ही रक्कम दिल्यानंतर मी वैभव खाटीक या माझ्या मालकीची गहाण ठेवलेली एच. १९ ई. ई. ०३३४ या नंबरची पल्सर कंपनीची दुचाकी परत मागीतली असता तुझ्याकडे माझे अजून पैसे निघतात ते दिल्याशिवाय मी तुझी दुचाकी परत देणार नाही तुझ्याकडून जे होईल ते करुन घे असे सांगून धमक्या देत आहेत म्हणून माझ्या व माझ्या कुटुंबातील सदस्यांना वैभव खाटीक याच्याकडून जिवीताला धोका निर्माण झाला आहे.म्हणून मी या अवैध सावकारी करणाऱ्या वैभव खाटीक पासून स्वसंरक्षण मिळावे माझी गहाण ठेवलेली गाडी आर. सी. बुकासह परत मिळावी याकरिता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला संबंधित सावकाराच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला आहे. परंतु अद्यापही माझ्या तक्रारीची दखल घेतली गेली नसून मी वैभव खाटीक याचे संपूर्ण पैसे परत दिले असल्यावर ही एका पोलीस कर्मचाऱ्याने तु वैभव खाटीकला पैसे देऊन टाक व गाडी सोडवून घे असा मौल्यवान सल्ला दिला आहे.हा सल्ला ऐकून मी आता हतबल होऊन खाजगी सावकाराकडून होणाऱ्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी तसेच संबंधित सावकाराकडून माझ्या व माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवीतस धोका निर्माण झाला असल्याने संबंधित सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता मा. जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे इमेल द्वारे तक्रार दिली आहे अशी माहिती दिपक प्रदिप गरुड याने प्रसार माध्यमाला दिली आहे.