छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : सोशल मिडीयावर धार्मीक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या तर हयगय करणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिला. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मिडीयावर तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करण्यात आल्या होत्या. यामुळे वातावरण खराब होण्याचे प्रकार घडल्याचेही समोर आले. अधीक्षक राठोड यांनी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या पोस्टची खात्री करावी. समाजकंटक दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नागरिकांनी तेढ निर्माण होइल अशा पोस्ट बनवू नये तसेच फॉरवर्ड करू नये.

कोणत्याही पोस्टला प्रतिक्रीया देताना संयम बाळगावा, प्रतिउत्तर देताना अपशब्दांचा वापर झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन अधीक्षक राठोड यांनी केले आहे.