कोयता गँगकडून पुण्यात माजी नगरसेवकाचा खून

कोयता गँगकडून पुण्यात माजी नगरसेवकाचा खून

पुणे : पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. मात्र गेल्या – काही दिवसांपासून या ठिकाणी गुन्हेगारीच वाढली आहे. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करुन हत्या करण्यात आली. या घटनेचा थरार आता सीसीटीव्हीमुळे समोर आला आहे. वनराज आंदेकर उभे असताना अचानक जमाव आला आणि त्यांच्यावर वार केले. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर यांना रुग्णालयात – दाखल करण्यात आलं. पण तिथे – त्यांची प्राणज्योत मालवली.वनराज आंदेकर रविवारी – रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर
हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच, कोयत्याने वार केले

. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये २०१७ च्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार करण्यात आलं आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *