छत्रपती संभाजीनगर : सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित के. बी. ॲबॅकस तर्फे भारतातील सर्वात मोठी खुली ॲबॅकस व वैदिक गणित स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे 17 ऑगस्ट 2025 रोजी सिडको एन-8 मधील राणाजी मंगल कार्यालयात पार पडली. या भव्य स्पर्धेत देशभरातून शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना 160 प्रश्न सोडवण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता, ज्यामध्ये अनेकांनी उत्तुंग कामगिरी करून आपले कौशल्य सिध्द केले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आयोजित पुरस्कार वितरण समारंभाला मा. ॲड. विशाल कदम, मा. शिवराज भूमरे, मा. नितीन चव्हाण, मा. डॉ. अभिजीत कंजे, मा. करडे साहेब व मा. सुभाष कोसरे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. ॲड. राहुल नावंदर, मा. डॉ. हसन ईनामदार व सौ. शोभा पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. सारनाथ सौंदडकर होते. या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब राघव नालकर, स्वरांश साखरे, अपेक्षा रंधे, साक्षी कावले, हर्ष भालेराव, संस्कार शिंदे, शनया तालन, राजयोगिनी चव्हाण, रिद्धिश गोवंदे व सृष्टि करडे यांनी पटकावला.

तसेच चॅम्पियन किताब पूर्वजा कुलकर्णी, मन्मथ डोरले, मायरा खान, वेदांश जाधव, संदेश सौंगडे, आरोही इंदुरकर, श्रेयश तोषटवाड, अर्ष बंग व शैलेश गायकवाड यांनी जिंकला. या प्रसंगी बोलताना मा. ॲड. राहुल नावंदर यांनी विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उंचावले असल्याचे सांगत अभिनंदन केले, तर अध्यक्ष डॉ. सारनाथ सौंदडकर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील यशासाठी प्रोत्साहित केले.