नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. जुलै २०२४ पासून लाहू होणाऱ्या महागाई भत्त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अखउझख चे जून २०२४ चे आकडे जारी करण्यात आले आहेत. या आकडेवारीनंतर आता” सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२४ पासून ५० टक्के महागाई भत्ता मिळतो. अखउझख इंडेक्समध्ये १.५ अंकांची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीसाठी अखउझख-खथ इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे जुलै २०२४ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती मिळणार हे स्पष्ट झाले आहे

. जून अखउझख इंडेक्समध्ये १.५ अंकांनी वाढ झाली आहे. मे महिन्यात अखउझख इंडेक्स १३९.९ अंकांवर होता. तो आता वाढून १४१.४ वर पोहोचला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात अखउझख इंडेक्स १३८.९ अंकांवर होता. त्यामुळे महागाई भत्ता वाढून ५०.८४ टक्क्यांवर 45 पोहोचला होता.