कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी त्याला सोडणार नाही-अजित पवार

कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी त्याला सोडणार नाही-अजित पवार

पुणे (प्रतिनिध) कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच भाष्य केले कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी त्याला सोडला जाणार नाही, पारदर्शक पद्धतीने काम झाले आहे पोलीस आयुक्तांक आरोप केले तर त्याचे पुरावे देण्यात यावे. पच संस्कृती वाढली आहे त्यावर कारवाई सुरु केली आहे, असे विधान त्यांनी केली. मतदानानंतर ते पहिल्यादांच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते सिंहगड रोडारील धायरी येथे एका घड्‌याळ दुकानाच्या शोरूमचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले पवार म्हणाले, की पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घङन्या. २१ आणि २३ मे रोजी दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून म्खालयामध्ये होतो. या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. देवेंद्र म्हणले मी तातडीने पुण्याला निघालो आहे. त्याच्यामध्ये स्वतः जातीनं त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली

. जी गुन्हा नोंदवला त्याचा लोकांनी चोथा केला. कोणाचाही हस्तक्षेप होगार नाही असे काम करायला सांगितले होते. माझा नेहमी चुकीच्या कामाला विरोध असतो, कारण, नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही, असे सांगून पवार म्हणाले की मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मी माझे काम करत असतो. एक तर यामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊन न देता कारवाई केली. ही घटना अतिशय गंभीर आहे. अशा प्रकारच्या गोष्टी कदापि चक्का कामा नये, असंही त्यांनी स्पष्ट केले पवार पुढे म्हणाले, राजकारण न आगता काम केले आहे. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणे हे पोलीस खात्याचे काम आहे. या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली, त्याच्याबद्दल मला वेळोवेळी आयुक्त अमितेशकुमार जी काही माहिती द्यायची ते देत होते. त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले. आज आम्ही दोघांनी त्याच्याबद्दलची चचर्चा केली त्यांनी प्रत्येक मिनिटाला कसे काय काय घडत गेले ते सांगितले, “न्यायालयाने काय निर्णय द्यावा न्यायालयाचा प्रश्न आहे. परंतु, त्याच्या संदर्भामध्ये पुढे सगळ्या गोष्टीत ज्या काही भूमिका दिला प्यायला पाहिजे तशा पद्धतीने घेतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात कोणीही राजकीय हस्तक्षेप केला नाही. आमदार सुनील टिंगरे यांनी खुलासा दिला केला असे पवार यांनी स्पष्ट केले

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *