काळ आला होता, पण वेळ आली नव्हती…

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती…

हेलिकॉप्टर कोसळले, सुषमा अंधारे सुखरुप

महाड शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली आहे. या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत. तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हे क्रॅश झाले. हेलिकॉप्टर कोसळ्याची दृश्य अंगावर काटा निर्माण करणारी आहेत.

सुषमा अंधारे अन् पायलट सुखरुप

राज्यभरात निवडणूक प्रचारासाठी सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले – होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रैश झाले . आहे. सकाळी हे हेलिकॉप्टर क्रैश झाले न असले तरी त्यात सुषमा अंधारे होत्या का? ही माहिती मिळाली नाही. परंतुसुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये पायलेट सुखरुप आहे. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वांच्या शुभेच्छामुळे सुखरुप – सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, एका दोन दिवसांत दोन तीन सभा होत्या. निघण्यापूर्वी आम्ही हेलिपॅडवर आला. त्यावेळी हेलिकॉप्टरने दोन, तीन घिरट्या मारल्या आणि आचानक हेलिकॉप्टर कोसळले. मी आणि विशाल गुप्ते या हेलिकॉप्टरने जाणार होतो. परंतु सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सर्व सुखरुप आहोत, असे त्यांनी सांगितले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *