फुलंब्री (प्रतिनिधी- हेमंत वाघ) : 23 ऑक्टोबर, वाघोळा येथील श्री रामेश्वर विद्यालय आणि कर्मयोगी शेषराव पाटील गायकवाड स्मृतिप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांच्यातील संवादकौशल्य वाढीस लावणे हा होता. स्पर्धेचे उद्घाटन mgm हॉस्पिटलचे नामवंत अस्थिरोग तज्ञ तज्ज्ञ डॉ. गिरीशजी नामदेवराव गाडेकर यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सर्जेराव ठोंबरे सर यांनी भूषवले. प्रमुख पाहुण्यांमध्ये पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेचे सचिव निवृत्ती गावंडे, मेधाताई नाईक, सलीम सिद्दिकी, विठ्ठल वायाळ, सुरेश पठाडे, रावसाहेब गाडेकर, लक्ष्मण नेमाने, सोमनाथ मेटे, श्री पठाण, सोमनाथ महाराज गायकवाड, आणि आजिनाथ झाल्टे यांचा समावेश होता. प्रतिस्पर्धी विद्यार्थ्यांचा शानदार सहभाग या वकृत्व स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 70 शाळांमधून प्रत्येकी एक प्रतिनिधी असे एकूण 70 विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धा दोन गटांमध्ये विभागली गेली – प्राथमिक गट आणि माध्यमिक गट.

माध्यमिक गटातील विजेते:
- पहिला क्रमांक – श्रावणी संतोष शेजूळ (संत गाडगेबाबा आश्रम शाळा, अंजनडोह) – फिरता चषक व रु. 5,555 नगद बक्षीस
- द्वितीय क्रमांक – निकिता अजिनाथ आगलावे (महारुद्र हायस्कूल, कुंबेफळ) – रु. 2,555 नगद बक्षीस
- तृतीय क्रमांक – वैष्णवी विनोद आप्पा लकडे (संत सावता गुरुकुल, फुलंब्री) – रु. 1,555 नगद बक्षीस
प्राथमिक गटातील विजेते:
- पहिला क्रमांक – श्रीरंग नरेंद्र कोसिडीकर (धर्मवीर संभाजी विद्यालय, सिडको) – फिरता चषक व रु. 5,555 नगद बक्षीस
- द्वितीय क्रमांक – समर्थ भागिनाथ तुपे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जळगाव मेटे) – रु. 2,255 नगद बक्षीस
- तृतीय क्रमांक – दिव्या कमलाकर लोखंडे (भगवान विद्यालय, आडगाव निपाणी) – रु. 1,555 नगद बक्षीस
- सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री उज्वल कुमार म्हस्के, श्री शैलेश गवळी, आणि श्री बळीराम मुरमे यांनी नि:पक्षपातीपणे काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान उबाळे, मुख्याध्यापक श्री रामेश्वर विद्यालय, यांनी केले. सूत्रसंचालन श्री संतराम मोरे यांनी संभाळले, तर प्रशस्तीपत्र लेखन श्री कैलास व्यवहारे यांनी केले. स्पर्धक नोंदणी संदेश सोनवणे यांनी केली व टाईम कीपरची जबाबदारी श्री एस.एस.चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील संधी
स्पर्धेच्या समारोपावेळी आयोजक विकास गायकवाड यांनी समाजातील तरुणांना अशा उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले. “विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. ग्रामीण भागातील मुलांमध्येही प्रचंड क्षमता आहे आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते उत्कृष्ट कामगिरी करू शकतात,” असे त्यांनी सांगितले. हा उपक्रम सर्व स्तरातून यशस्वी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांना पाठबळ देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.