कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये यशस्वी 100+ रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया; मराठवाड्यात ‘Velys Robotic Solution’ चे पहिले प्रगत केंद्र

कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये यशस्वी 100+ रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया; मराठवाड्यात ‘Velys Robotic Solution’ चे पहिले प्रगत केंद्र

छत्रपती संभाजीनगर : एमएमआरआय ट्रस्टच्या कमलनयन बजाज हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हॉस्पिटलने 100 पेक्षा अधिक गुडघा बदलाच्या शस्त्रक्रिया आणि 100 हून अधिक रोबोटिक सहाय्यित शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. हे यश मराठवाड्यासारख्या विभागात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या यशस्वी अंमलबजावणीचे प्रतीक ठरत आहे. या उल्लेखनीय वाटचालीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि भविष्यातील सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टिकोनातून, रविवार, 18 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता, कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज ऑडिटोरियम येथे “Orthopaedic Velys Robotic Assisted Solution” या अत्याधुनिक यंत्रणेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री (इतर मागासवर्ग, दुग्धविकास आणि नवीकरणीय उर्जा विभाग) तसेच छत्रपती संभाजीनगर (पूर्व) मतदारसंघाचे आमदार श्री. अतुलजी सावे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (छत्रपती संभाजीनगर) चे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर हे विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या या प्रगत यंत्रणेमुळे आता रुग्णांना गुडघा व सांधेदुखीवरील शस्त्रक्रियेसाठी मेट्रो शहरांमध्ये जावे लागणार नाही. मराठवाडा आणि परिसरातील लोकांसाठी ही सेवा स्थानीय पातळीवरच उपलब्ध झाली आहे — तीही जागतिक दर्जाची व परवडणारी. याप्रसंगी डॉ. जॉर्ज नोएल फर्नांडिस, सीईओ, एमएमआरआय ट्रस्ट, कमलनयन बजाज हॉस्पिटल यांनी संपूर्ण वैद्यकीय टीम आणि समाजाचे आभार मानले. त्यांनी सांगितले,

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *