कन्नडमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग
कन्नड (प्रतिनिधी):- आठ दिवसांपासून घंटा गाड्या बंद असल्याने कन्नड शहरात अनेक भागात कचऱ्यांचे अक्षरशा ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे कन्नडकर त्रस्त झाले आहेत, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील डसबिनमध्ये मोजकाच कचरा जमा होतो, ते भरताच तो कचरा नागरीक मोकळ्या जागेवर फेकतात. यामुळे कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत. डुकरे, गाई, गुरे हा कचरा पायाने रस्त्यांवर पसरवत आहे. त्यामुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागत आहे, दुर्गंधीमुळे आजुबाजूचे नागरीक त्रस्त आहेत

, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी घंटागाड्या चालू कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.पंधरा दिवसांपासून घंटा गाड्या येत नाहीत, घरात डसबिन भरून कचरा पडून आहे. शहरातील नाल्याही कचऱ्याने भरल्याने डास वाढले आहेत. नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी कामावर नाहीत. ही समस्या लवकर सोडावी नसता नगरपरिषदवर युवकांचा मोर्चा काढण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते आकाश बोलधने यांनी सांगितले तर सोमवार (दि.२७) पासून नियमितपणे शहरात घंटा गाड्या सुरू करून साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल, शहर स्वच्छतेवर भर देण्यात येईल असे नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.