ब्राम्हणी नदीजवळील कत्तल खाण्यावर छापा
कन्नड, (प्रतिनीधी) शहरातील रिठ्ठी-मोहर्डा रोडवरील ब्राम्हणी नदीच्या काठावर असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कन्नड शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी छापा मारून, १ लाख २६ हजार रुपये किमतीचे लहानमोठे गोवंश ताब्यात घेऊन दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील ब्राम्हणी नदीच्या काठी असलेल्या अवैध कत्तलखाण्या जवळ गोवंश हत्येच्या इराद्याने काही गोवश बांधून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके, सहायक फौजदार गणेश जैन, सलीम शहा, पोलिस कॉन्स्टेबल विजय चौधरी यांनी गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता छापा मारला.

या ठिकाणी युनूस हुसेन कुरेशी (वय ६० कसाईवाडा), युनूस गणी शेख (वय ४७रा. पांढरी मोहल्ला) हे दोघे एका कुडाच्या लहान खोलीत बसलेले होते. याच खोलीत ७लहान मोठे बैल ज्यांची किंमत १ लाख २६ हजार रुपये हे अत्यंत निर्दयीपणे, विणा चारापाण्याचे बांधून ठेवलेले आढळुन आले. यावेळी पंचासमक्ष रितसर पंचनामा करून बैलांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.